Site iconSite icon bolbhau.com

Jilha Parishad Bharti 2023 चे वेळापत्रक जाहीर, लवकरच येणार भरतीची जाहिरात…!

 

Contents hide

Table of Contents

Toggle

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या Jilha Parishad Bharti 2023 जिल्हा परिषदेतील पद भरतीची जाहिरात ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता लातूर जिल्हा परिषदेच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. जिल्हा परिषद भरती संदर्भात, येत्या चार दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्हीसीद्वारे राज्यभरातून मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा परिषद भरतीची डेमो वेबसाईट जाहीर झाली आहे. जाहिरात कधी येणार, यासंबंधित सुशिक्षित तरुण वर्गाकडून सातत्याने विचारणा होत आहे. महाराष्ट्र राज्यातल्या काही जिल्हा परिषदांनी आकृतीबंध तयार न केल्याने पद भरती विलंब होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांच्या मानात पद भरतीबाबत फारसी उत्सुकता दिसत नाही, अशी चर्चा सुशिक्षित तरूणांत सुरू आहे. आता डेमो वेबसाईट सुरू करून देखील दोन महिने होऊन गेले. मात्र, अजून जाहिरात निघालेली नाही. त्यामुळे सरकारच्या कारभाराबद्दल विश्वासार्हता घसरत असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र शासनाच्या Jilha Parishad Bharti 2023 अंतर्गत जिल्हा परिषद गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे 9 मे 2023 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय GR जाहीर करण्यात आलेला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अनुक्रमणिका पदाचे नाव
1 आरोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरूष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणी पुरवठा/ लघु पाटबंधारे)
7 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
8 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
9 कनिष्ठ आरेखक
10 माध्यम कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी
12 कनिष्ठ सहाय्यक लिपिक
13 कनिष्ठ सहाय्यक लेखा
14 जोडारी
15 तारतंत्री
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 लघुटंकलेखक
22 लघुलेखक (उच्च श्रेणी)
23 लघुलेखक (निम्न श्रेणी)
24 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
25 वरिष्ठ सहाय्यक लेखा
26 माध्यम विस्तार अधिकारी (कृषि)
27 विस्तार अधिकारी (पंचायत)
28 विस्तार अधिकारी (शिक्षण) माध्यम
29 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
30 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे) माध्यम

 

महाराष्ट्र शासनाच्या Jilha Parishad Bharti 2023 अंतर्गत जिल्हा परिषद गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत वरील पदानुसार वेगवेगळ्या अभ्यासक्रम खालील प्रमाणे दिलेला आहे. अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम हा सविस्तरपणे दिलेला आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे 9 मे 2023 रोजी एक नवीन सुधारित शासन निर्णय GR येथे बघा .

अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा.

 

Exit mobile version