नाशिक – महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे “कृषी सेवक “ म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन – क्र. मकसी – १००७/ प्र.क्र. ३६/ का. ३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर “कृषी सेवक” पदांवरील भरतीकरिता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या विविध जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 14/09/2023 पासून ते दिनांक 03/10/2023 रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल http://www.krishi.maharashtra.gov.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – Vacant Posts | नाशिक कृषी विभागात “कृषी सेवक ” भरती २०२३ – रिक्त पदे
Organization (संस्था ) |
|
District Name (जिल्ह्याचे नाव ) |
No of Posts / रिक्त पदे |
१) नाशिक |
१३० |
Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची स्वतंत्रपणे माहिती कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – महाराष्ट्रातील कृषी व पदुम विभागातील “कृषी सेवक ” भरती २०२३ – विभागांनुसार सविस्तर जाहिराती पुढीलप्रमाणे –
Organization (संस्था ) |
कृषी विभाग “कृषी सेवक ” भरती २०२३ |
District Name (जिल्ह्याचे नाव ) |
नाशिक विभागानुसार सविस्तर जाहिरात |
१) नाशिक | येथे क्लिक करा |
सोबत हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!