Site iconSite icon bolbhau.com

KVS Admission 2024 – केंद्रीय विद्यालयात इयत्ता १ ली ते १२ वी साठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – केंद्रीय विद्यालय संघटन (KVS ) अंतर्गत KVS Admission 2024 साठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता १ ली ते १२ वी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे १ ली च्या २०२४ च्या प्रवेशाकरिता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी kvsonlineadmission.kvs.gov.in हे खास पोर्टल चालू केलेले आहे. केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इंच्छित पालक किंवा विद्यार्थी केंद्रीय विद्यालयाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

KVS Admission 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

इयत्ता १ ली साठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १५ एप्रिल, २०२४ आहे, तसेच इयत्ता २री ते त्यापेक्षा मोठ्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी १० एप्रिल, २०२४ हि तारीख अंतिम असेल, याची सर्व पालक व विद्यार्थी वर्गाने नोंद घ्यावी. इयत्ता ११ वी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सूचित येते की, इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रिया १० वीच्या निकालानंतर १० दिवसानंतर सुरु करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे जाहीर केलेल्या शेड्युल नुसार, केंद्रीय विद्यालय इयत्ता १ ली साठीची पहिली यादी १९ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल. यानंतर देखील प्रवेशासाठी जागा शिल्लक राहत असतील, तर केंद्रीय विद्यालय संघटन २९ एप्रिल, २०२४ रोजी दुसऱ्या तसेच अंतिम प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करेल.

केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे फेब्रुवारी २०२४ पर्यंत नव्याने चालू झालेल्या केंद्रीय विद्यालयातील इयत्ता १ ली साठी प्रवेश प्रक्रिया २०२४ च्या ऑनलाईन पोर्टल मार्फत घेण्यात येईल. तसेच इतर वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची जाहीर सूचना करण्यात येत आहे.

KVS Admission 2024 आवश्यक कागदपत्रे

केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज भरतेवेळीस पुढील सूचना आणि महत्वाची कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

PCMC Recruitment 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी ३२७ जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!

FAQ
  1. KVS Admission 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख.

2.    KVS Admission 2024 आवश्यक कागदपत्रे.

केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज भरतेवेळीस पुढील सूचना आणि महत्वाची कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

Exit mobile version