नवी दिल्ली – केंद्रातील नरेंद्र मोदी शासनाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपूर्ण भारतातील गृहिणींसाठी मोठी भेट दिलेली आहे. केंद्र सरकारमधील मंत्री श्री. अनुराग ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्यात आल्याची मोठी घोषणा केलीली आहे. Lpg Cylinder Rate – ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरामधील महिला वर्गाला मोठी भेट दिली आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे बुधवारपासून म्हणजेच २९ ऑगस्ट, २०२३ पासून देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती २०० रूपयांनी घट करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे.
संपूर्ण देशामधील Lpg Cylinder Rate – ७५ लाखांच्या आसपास असणाऱ्या महिलांना मोफत उज्ज्वला गॅस सिलेंडर कनेक्शन देण्यात येणार असल्याचे हि केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. त्याकरिता त्या महिलांना कोणताही खर्च करण्याची गरज नाही. उज्वला गॅस कनेक्शन बरोबर सर्व वस्तू म्हणजे गॅस वाहक पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. संपूर्ण जगभरामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती वाढलेल्या आहेत, परंतु भारतामध्ये त्याचा कोणताही परिणाम जाणवत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकूर यापुढे बोलले कि, आतापर्यंत उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवरती २०० रुपये अनुदान देण्यात येत होते, त्या अनुदानामध्ये आणखी २०० रुपयांचा अतिरिक्त अनुदानाचा लाभ सर्व उज्वला गॅस धारकांना देण्यात येणार आहे. Lpg Cylinder Rate – याचाच अर्थ असा कि, यापुढे उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक सिलेंडरमध्ये ४०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. संपूर्ण देशामध्ये ३३ कोटींच्या आसपास नागरिकांनी गॅस कनेक्शन घेतलेले आहे. म्हणजे आता सध्या देशामध्ये ३३ कोटी गॅस सिलेंडर धारक आहेत. त्यामध्ये भर म्हणजे आणखी ७५ लाख नवीन गॅस कनेक्शन संपूर्ण देशामध्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे या सर्वांचा खर्च सुमारे ७६८० कोटीच्या आसपास येणार आहे. याचा संपूर्ण भार केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार उज्वला गॅस सिलेंडरकरिता प्रत्येक लाभार्थ्यांमागे ३६०० रुपयांच्या आसपास खर्च करीत असून, Lpg Cylinder Rate – आजपर्यंत सुमारे ९ लाख ६० हजार महिलांना संपूर्ण देशामध्ये उज्वला गॅस सिलेंडरचा लाभ दिला गेल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले. यांबरोबरच अजून ७५ लाख नवीन महिलांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केंद्रामध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकार २०१४ साली सत्तेमध्ये आलं होतं, त्यावेळी भारत देशामध्ये फक्त १४ कोटी ५० लाख लोकांकडेच गॅस कनेक्शन अस्तित्वात होतं. Lpg Cylinder Rate – परंतु आज भारत देशातील सुमारे ३३ कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन असल्याचं केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकुर यांनी सांगितलं आहे.
आज भारत देशातील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास ११०० रुपयांच्या वर गेलेली आहे, केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बुधवारपासून म्हणजे २९ ऑगस्ट, २०२३ पासून , गॅस सिलेंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत खाली येणार आहे. Lpg Cylinder Rate – त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना विशेषतः महिला वर्गाला या निर्णयाचा मोठा फायदा मिळणार आहे. सर्व स्थरांतून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
#WATCH | "PM Modi has decided Rs 200 reduction in the price of domestic LPG cylinders, for all users…this is a gift from PM Narendra Modi, to the women of the country, during the occasion of Raksha Bandhan", says Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/QTy6YB0x4u
— ANI (@ANI) August 29, 2023