Site iconSite icon bolbhau.com

Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

मुंबई – वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल ), रोही (निलगाय ) व माकड /वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. Maharashtra Forest Department जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

सध्याच्या आर्थिक तरतुदीत मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती. Maharashtra Forest Department जनप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत होणाऱ्या मागणीस अनुसरून वन्यप्राणी हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, कायस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी प्रकरणी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य्य रक्कम / खर्च वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

Maharashtra Forest Department – शासन निर्णय पुढील प्रमाणे – :

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल ), रोही (निलगाय ) व माकड /वानर यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू, / कायमस्वरूपी अपंगत्व / मनुष्य गंभीर जखमी / किरकोळ जखमी झाल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य्य / खर्च प्रतिपूर्ती देण्यात यावी.

. क्र .

 तपशील

 देय  असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम

)

 व्यक्ती मृत्यू पावल्यास

 रुपये २५,००,००,०००/-  (रु. पंचवीस लाख फक्त )  

)

 व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास

 रुपये ,५०,०००/- ( रु. सात लाख पन्नास हजार फक्त )

)

 व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्यास

 रुपये ,००,०००/-  (रु. पाच लाख फक्त )

)

 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास  औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये ५०,०००/-  (रु. पन्नास हजार फक्त ) प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय / जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

 

Maharashtra Forest Department – अशी मिळणार रक्कम

या अर्थसाहाय्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी १० लाख रुपये व्यक्तीच्या वारसांना तात्काळ धनादेशाद्वारे देण्यात येणार आहेत, तर उर्वरित १० लाख रुपये रक्कम पाच वर्षांकरिता मुदतठेव म्हणून ठेवली जाणार आहे, तर उर्वरित पाच लाख रुपयांची रक्कम दहा वर्षांकरिता मुदतठेवीत ठेवावी लागणार आहे. म्हणजेच दहा वर्षानंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळणार आहे. त्यामुळे वारसांना खर्चाचा ताळमेळ बसविताना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Forest Department – वन्यजीव – मानव संघर्ष नित्याचाच झालेला आहे.

एकट्या तळोदा तालुक्यात वन्यजीव व मानव संघर्ष नवीन नाही. एकाच वेळी दोन तीन बिबटे शेतकऱ्यांना दृष्टीस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अस्वलांच्या हल्ल्यातही वाढ झाली आहे. मागील दहा वर्षांतील आकडेवारीत हा संघर्ष वाढताच राहिला आहे. त्यात आतापर्यंत दहा वर्षांत दहापेक्षा अधिक माणसे मृत्युमुखी पडली, तर सुमारे ६०० प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे तालुक्यातील हा संघर्ष नित्याचाच झालेला आहे.

हेही वाचा

PCMC Recruitment 2023 – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !

Exit mobile version