मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक ०२ जुलै, २०१२ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे, तर आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून, दिनांक २३ सप्टेंबर, २०१८ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. Mahatma Phule Arogya Yojana – दिनांक २६ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजनेशी सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दिनानिक ०१ एप्रिल, २०२० पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत काही बदल व योजनेचे विस्तारीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे – Mahatma Phule Arogya Yojana सवांनी नक्की वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
१. १) सध्या आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY ) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५ लक्ष एवढे आहे. तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत (MJPJAY ) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब रु. १. ५ लक्ष एवढे आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्षी रु. ५ लक्ष एवढे करण्यात येत आहे.
२) सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण रु. २. ५ लक्ष एवढी आहे, ती आता रु. ४. ५० लक्ष एवढी करण्यात येत आहे.
३) सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ९९६ व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात येत आहेत. तर ३२८ मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संख्येत १४७ ने वाढ होऊन उपचार संख्या १३५६ एवढी करण्यात आलेली आहे व १३५६ एवढेच उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचार संख्या ३६० ने वाढविण्यात येत आहे. सदर १३५६ उपचारांपैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील. (परिशिष्टे २ ते ५ जोडली आहे)
४) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या १००० एवढी आहे. सदर योजना याआधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू असून सीमा लगतच्या महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात १४० व सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यांत १० अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या व्यतिरिक्त २०० रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या १३५० होईल. याशिवाय सर्व शासकीय रुग्णालये या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नवीन शासन आदेश
५) वरील ४) मध्ये नमूद रुग्णालयाव्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरु होणारे सर्व रुग्णालये, अशा रुग्णालयांची इच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.
६) आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.
७) स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या दिनांक १४-१०-२०२० च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात येत आहे. तसेच उपचारांची खर्च मर्यादा रु. ३००००/- ऐवजी प्रति रुग्ण प्रति अपघात रु. १ लक्ष एवढी करण्यात येत आहे आणि या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत काण्यात येत आहे. सदर लाभार्ध्यांचा समावेश गट ‘ड ‘ मध्ये करण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या ‘अ’ ‘ब’ व ‘क ‘ या गटांमध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील / देशाबाहेरील रुग्ण यांचा समावेश करण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नवीन शासन आदेश
८) सदर योजना संपूर्णपणे हमी तत्वावर चालविण्यात येईल म्हणजे उपचाराचा जो खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटी थेट अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करेल. संपूर्णपणे हमी तत्त्वावर राबवण्याची यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्या पद्धतीनुसार (विमा आणि हमी तत्त्वावर ) मात्र वरील १ ते ७ येथील सुधारित तरतुदीनुसार योजना राबविण्यात येईल.
९) शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंधित रुग्णालयांकडेच ठेवण्यास परवानगी देण्यात येईल. यासंबंधातील सविस्तर आदेश नंतर निर्गमित करण्यात येतील.
२. Mahatma Phule Arogya Yojana- लाभार्थी घटक – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी घटक पुढीलप्रमाणे असतील.
Mahatma Phule Arogya Yojana- विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत काही बदल व योजनेचे विस्तारीकरण संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण आदेश पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावा.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नवीन शासन आदेश
सोबत हेही वाचा
सर्वांचे पंतप्रधान आयुष्यमान योजना कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा