Site iconSite icon bolbhau.com

PM KISAN YOJNA – नमो शेतकरी आणि पी. एम. किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळवायचे असतील, तर करा ही कामे ! शेवटची संधी !!

मुंबई – सर्व शेतकरी मित्रांनो नमस्कार ! PM KISAN YOJNA अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांना काही अटी आणि शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची ekyc करणे, सर्वांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक असायलाच हवे. त्याचप्रमाणे फिजिकल व्हेरीफिकेशन साठी ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची नावे संबंधित यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या सर्व संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापले फिजिकल व्हेरीफिकेशन करून घेणे आवश्यक आहे.

शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत मागील हफ्ते वितरित होत असताना ekyc ची अट शासनातर्फे काही अंशी शिथिल करून संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना pm kisan yojna च्या रकमेचे वितरण करण्यात आलेले होते. परंतु त्यामुळे आज देखील महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या वर शेतकरी आज ekyc न करता संबंधित योजनेचा लाभ उचलत होते. त्यामुळे अशा सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांना शासनातर्फे ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे. यानंतर देखील जे कोणी ekyc पूर्ण करणार नाहीत, त्यांना सरसकट लाभार्थी यादीतून बाहेत काढण्यात येईल.

PM KISAN Yojna – संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांमधील जे शेतकरी बांधव त्यांची ekyc २० सप्टेंबर, २०२३ पर्यंत पूर्ण करणार नाहीत, आधार कार्ड प्रमाणीकरण करणार नाहीत, किंवा ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरीफिकेशन यादीमध्ये नाव आलेले आहे, ते आपले संपूर्ण संबंधित कागदपत्रे जमा करणार नाहीत, अशा प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर, २०२३ या तारखेनंतर सदर योजनेतून सरसकट बाद करण्यात येईल. याचाच अर्थ संबंधित सर्व शेतकरी यापुढे १२००० रुपयांच्या शासकीय अनुदानाला मुकणार आहेत.

PM KISAN Yojna साठी पात्र असणारे सर्व संबंधित लाभार्थी शेतकरी मुख्यमंत्री किसान योजना अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. PM KISAN Yojna लाभार्थी पात्र शेतकऱ्यांची यादी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभार्थी वितरणासाठी वापरण्यात येणार आहे. संबंधित दोन्ही पोर्टलचे एकत्रीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. २० सप्टेंबर, २०२३ नंतर ekyc पूर्ण झालेले संबंधित PM Kisan लाभार्थी शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी योजनेसाठी पात्र होतील.

Pm kisan yojna   : त्यात भर म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे ६ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शेतकरी डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. जुलै २०३ ते ऑगस्ट २०२३ च्या पहिल्या आठवड्यात संबंधित अनुदानाचे वितरण होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे संबंधित अनुदानाचे वाटप अद्याप करण्यात आलेले नाही, संबंधित अनुदानाचे वितरण गौरी – गणपतीच्या मुहूर्तावर होईल, अशी शक्यता होती, परंतु आजपर्यंत राज्य शासनातर्फे याबद्दलची कोणतीही सूचना, निर्णय, घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही.

PM KISAN Yojna संबंधित योजनेचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी युद्धपातळीवर सरकारच्या माध्यमातून चालढकल केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यापुढे अंतिम पात्र झालेल्या लाभार्थ्यांसह, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अंतिम लाभार्थी यादी घोषित करण्यात येणार आहे. परंतु प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार हे अनुदान वितरण गौरी – गणपतीच्या दरम्यान वाटप करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. परंतु ekyc ची प्रक्रिया, राज्य शासनाची प्रक्रिया, या सर्वांच्या पार्श्वभूमी नुसार हे वितरण ३० सप्टेंबर, २०२३ नंतरच वाटप होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीप : ज्या ज्या शेतकरी बांधवांना PM KISAN Yojna चा १४वा हफ्ता आलेला आहे, त्यांना यापुढील पीएम किसान चा पुढील हफ्ता व नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकरी बांधवांनी वरील कोणतीही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही.

सोबत हेही वाचा

1 – Peon Recruitment 2023 – महाराष्ट्र शासनाच्या “शिपाई” पदासाठी भरती ! पगार ४७६०० ! लगेच अर्ज करा !!

2- ONGC Recruitment 2023 – ओ.एन. जी. सी. मध्ये मेगा भरती ! १० वी – १२ वी – ITI साठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

3 – National Seeds Corporation Recruitment – राष्ट्रीय बियाणे महामंडळात मोठ्या नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

4- CWC Recruitment 2023 – केंद्रीय वखार महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी ! पगार दीड लाखापर्यंत ! १५३ जागा ! लगेच अर्ज करा !!

5- Arogya Vibhag Bharti 2023 – आरोग्य विभागाची भरती ! १० हजार ९४९ जागांची भरती ! लगेच अर्ज करा !!

6- Rbi Recruitment 2023 – भारतीय रिझर्व्ह बँकेत मेगा भरती ! ४५० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

Exit mobile version