Site iconSite icon bolbhau.com

PM Yasasvi Scholarship – ९ वी आणि ११ वी मधील विद्यार्थ्यांना मिळणार १ लाख २५ हजार रुपये. अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. लवकरात लवकर करा अर्ज.

दिल्ली – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. PM Yasasvi Scholarship च्या अधिकृत संकेतस्थळावरून इच्छूक आणि पात्र विद्यार्थी उमेदवार पीएम यशस्वी शिष्यवृत्ती २०२३ करिता ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छूक आणि पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ११ जुलै, २०२३ ते १७ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये PM Yasasvi Scholarship पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठीची परीक्षा २९ सप्टेंबर २०२३ या दिवशी होणार आहे. जे विद्यार्थी आता इयत्ता ९वी आणि ११वी या इयत्तेमध्ये शिकत असणारे विद्यार्थी पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठी अर्ज करू शकतात. PM Yasasvi Scholarship पात्रता, अर्ज फी, फायदे, वयोमर्यादा, परीक्षेचा नमुना, अर्जाची लिंक आणि प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ ची अधिकृत जाहिरात सोबत संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide
1 इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या अनुसूचित जमाती (DNT, SNT) प्रवर्गातील भारतीय विद्यार्थी PM Yasasvi Scholarship योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Table of Contents

Toggle

पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ ची जाहिरात https://yasasviaudit.nta.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. PM Yasasvi Scholarship – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ करिता ऑनलाईन अर्ज ११ जुलै २०२३ रोजी पासून सुरू झालेले आहेत. पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ करण्यात आलेली आहे. PM Yasasvi Scholarship यासाठी लेखी परीक्षा पद्धतीने परीक्षा होणार आहे. दिनांक १९ सप्टेंबर, २०२३ रोजी घेण्यात येईल. पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही योजना OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, लेखी परीक्षेद्वारे या पंतप्रधान शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी उमेदवारांची निवड करत असते. यासाठी NTA ला २०२३ च्या PM यशस्वी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

“पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या अनुसूचित जमाती (DNT, SNT) प्रवर्गातील भारतीय विद्यार्थी PM Yasasvi Scholarship योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 

पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख वाढवण्यात आल्याची अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता ९ वी आणि ११ वी मध्ये शिक्षण घेत आहेत, ते विद्यार्थी यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यासक्रम पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला जाणार आहे. पंतप्रधान यशस्वी योजना २०२३ अंतर्गत, गुणवत्तेच्या आधारावर, इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये (७५,०००/-) आणि इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये (१,२५,०००/-) शिष्यवृत्ती म्हणून देण्यात जाईल. PM Yasasvi Scholarship – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आणि थेट महत्वाची लिंक खाली उपलब्ध करून दिलेली आली आहे. पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ बद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती पुढे खाली दिलेल्या अधिकृत अधिसूचनेवरून पाहण्यास मिळेल.

 

PM Yasasvi Scholarship साठी ऑनलाइन अर्ज करायचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठी अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे. याचा अर्थ , PM Yasasvi Scholarship साठी प्रत्येक उमेदवार या पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्तीसाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.

इयत्ता ९ वी साठी : इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांचा जन्म ०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०११ दरम्यान झालेला पाहिजे. यासोबतच या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे.

अकरावी इयत्ते साठी : इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचा जन्म ०१ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००९ दरम्यान झालेला पाहिजे. यासोबतच या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे.

PM Yasasvi Scholarship – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठी, विद्यार्थ्यांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

१) विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

२) विद्यार्थी OBC किंवा EBC किंवा DNT श्रेणीतील असणे आवश्यक आहे.

३) अर्जदार विद्यार्थी विहित उच्च श्रेणीच्या शाळांमध्ये शिकत असावा. अशा शाळांची यादी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

४) पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती २०२३ साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने २०२२-२३ मध्ये इयत्ता ८ वी किंवा इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेली असावी.

५) कुटुंबाचे सर्व स्त्रोतांकडून पालक किंवा पालकांचे उत्पन्न वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

६) ९ वी च्या विद्यार्थ्याचा जन्म ०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०११ दरम्यान झालेला असावा. या दोन्ही तारखांचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

७) इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्याचा जन्म ०१ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००९ दरम्यान झालेला पाहिजे. यामध्ये या दोन्ही तारखांचा समावेश करण्यात आलेला आहे.

८) पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुले आणि मुली दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत. मुलींसाठी आणि मुलांसाठी पात्रता निकष समान आहे.

PM Yasasvi Scholarship – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ अंतर्गत, विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे फायदे दिले जातील.

१) पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ उत्तीर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर ०९ वी च्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

२) पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर ०१ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

३) PM Yasasvi Scholarship – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजनेद्वारे एकूण १५००० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येक राज्यातून शिष्यवृत्ती दिली जाते. पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ अंतर्गत, यावेळी यावर्षी पासून जागांची संख्या सुमारे ३० हजार पर्यंत राज्यनिहाय वाढविण्यात आलेली आहे.

PM Yasasvi Scholarship- पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ करिता महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत.

१) पंतप्रधान यशस्वी योजना २०२३ चे आयोजन OBC, EBC आणि DNT विद्यार्थ्यांना नामांकित उत्कृष्ट शाळांमधील इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी करण्यात आले आहे.

२) सध्या इयत्ता ९ वी आणि ११ वी मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन आपले अर्ज करू शकतात.

३) प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ साठीची लेखी परीक्षा दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येईल.

४) पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ मध्ये फक्त उपस्थित राहणे किंवा त्यात पात्रता मिळवणे म्हणजेच ते शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांना / उमेदवाराला कोणताही अधिकार देत नाही.

५) पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्तीची निवड आणि पारितोषिक पात्रता निकष, पात्रता, गुणवत्ता यादीतील क्रमांक, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि योजनेअंतर्गत संबंधित शासनाने विहित केलेल्या इतर बाबींच्या पूर्ततेच्या अधीन आहे.

FAQ

PM Yasasvi Scholarship – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती २०२३ साठी काही प्रश्न असतील तर पुढील लिंक वर क्लिक करून आपली खात्री करून घ्यावी.

येथे क्लिक करा

सोबत हेही वाचा

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

Exit mobile version