Site iconSite icon bolbhau.com

Pradhan Mantri Pik Vima Yojana – प्रधानमंत्री पीक विमा फॉर्म भरण्यास मुदतवाढ – “०३ ऑगस्ट, २०२३ पर्यंत”, याची नोंद घ्यावी !

Pradhan Mantri Pik Vima Yojana – महाराष्ट्र राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने सर्व शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये प्रधान मंत्री पीक विमा योजना २०२३ जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वदूर प्रत्येक गावातील CSC केंद्रांवर Pradhan Mantri Pik Vima Yojana चे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात  की, आपण आपल्या गावातील CSC केंद्रांवर जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Contents hide

Table of Contents

Toggle

प्रधान मंत्री पीक विमा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख शासनातर्फे ३१ जुलै, २०२३ पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी Pradhan Mantri Pik Vima Yojana या योजनेत लवकरात लवकर ३१ जुलै, २०२३ पर्यंत आपला फॉर्म भरून लाभ घ्यावा.

Pradhan Mantri Pik Vima Yojana योजनेमध्ये शेतकरी सहभागाबाबत त्यांनी लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे :

१) अर्जदार शेतकऱ्याने Pradhan Mantri Pik Vima Yojana योजनेत नोंदणी केलया बाबतची पोचपावती मिळाल्यानंतर,  सी. एस. सी. व्ही.एल.ई. / बँक / मध्यस्थ यांनी भरलेली माहिती जसे की, जमीन तपशील, बँक खाते क्रमांक, प्रधान मंत्री पीक विमा नोंदणी केलेले पीक, विमा उतरवलेले क्षेत्र, विमा हप्ता टक्कम यासारख्या महत्त्वाच्या बाबींची व्यवस्थित तपासणी करावी.

२) प्रधान मंत्री पीक विमा योंजनेच्या नोंदणी पावतीची सत्यता पावतीच्या पृष्ठ १ वर छापलेला क्यूआर कोड स्कॅन करून तपासली जाऊ शकते.

३) Pradhan Mantri Pik Vima Yojana अर्जदार शेतकऱ्यांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या माहितीवरून जमिनींचा तपशील इ. तपासून घ्यावा.

४) Pradhan Mantri Pik Vima Yojana नोंदणी पावतीवरील माहितीच्या संदर्भात काही विसंगती आढळल्यास, अर्जदाराच्या शेतकऱ्याने सीएससी सेंटर / बँक / मध्यस्थ यांच्या निदर्शनास आणून आवश्यक ती सुधारणा करून घ्यावी.

Pradhan Mantri Pik Vima Yojana साठी अर्जदार शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना खालील प्रमाणे : –

१) प्रधान मंत्री पीक विमा योजनेचे Pradhan Mantri Pik Vima Yojana अर्जदार शेतकऱ्याला कोणत्याही माध्यमाद्वारे (सीएससी सेंटर / बँक / मध्यस्थ) नावनोंदणी करताना नोंदणी शुल्क भरणे आवश्यक नाही. सीएससी / मध्यस्थांद्वारे नावनोंदणी करतेवेळी केवळ शेतकरी विमा हप्ता रक्कम (म्हणजेच फक्त १ रुपया ) भरणे आवश्यक आहे.

२) शेतकऱ्यांनी प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर नमूद केलेला तपशील व Pradhan Mantri Pik Vima Yojana नोंदणी अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्रांवरती नमुद असलेला तपशील यामध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास किंवा माहिती न जुळल्यास संबंधित अर्ज नाकारला जाऊ शकतो. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद करून घ्यावी.

३) प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार Pradhan Mantri Pik Vima Yojana अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नेसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणी नंतर १४ दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या ७२ तासांच्या आत Crop Insurance App / पृष्ठ क्र. वरती दर्शविलेला विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक / बँक / महसूल / कृषि विभाग यांना द्यावी. सदरची जोखीम केवळ अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांनाच लागू होईल.

४) प्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व Pradhan Mantri Pik Vima Yojana योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग / संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही.

५) कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसीत केलेल्या अँड्रॉइड आधारित Crop Insurance App द्वारे Pradhan Mantri Pik Vima Yojana साठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्याच्या अर्जाची सध्यस्थिती पाहता येते. सदरचे अँप Google Play Storewww.pmfby.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Pradhan Mantri Pik Vima Yojana अंतर्गत सहभाग प्रक्रिया:

१) कर्जदार शेतकरी: प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे, तथापि Pradhan Mantri Pik Vima Yojana साठी कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल, त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकाच्या ७ दिवस आधी संबंधीत बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधीत बँकेमार्फत करण्यात येईल.

२) बिगर कर्जदार शेतकरी: ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी Pradhan Mantri Pik Vima Yojana साठी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत अथवा सी एस सी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी.

३) कुळाने अथवा भाडेपट्टा कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी Pradhan Mantri Pik Vima Yojana विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार (Registered Agreement) अपलोड करणे बंधनकारक आहे.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा (Pradhan Mantri Pik Vima Yojana) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी पीक विमा हफ्ता फक्त १ रुपया प्रति अर्ज.
Pradhan Mantri Pik Vima Yojana – प्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित बाबी:

प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने  स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणी नंतर १४ दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या ७२ तासाच्या आत Crop Insurance App/ विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक/बँक/ संबंधित बैंक/ कृषि विभाग यांना दयावी. सदरची जोखिम  Pradhan Mantri Pik Vima Yojana केवळ अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांनाच लागू होईल.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व Pradhan Mantri Pik Vima Yojana योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून, अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेसाठी Pradhan Mantri Pik Vima Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची शेवटची तारीख :

प्रधान मंत्री पीक विमा Pradhan Mantri Pik Vima Yojana अर्ज भरण्यासाठी त्वरा करा !  बँक शाखा/ सी.एस.सी. केंद्रामध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मुदतीच्या आधीच होईल, ह्याची सर्व शेतकऱ्यांनी खात्री करा.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी Pradhan Mantri Pik Vima Yojana योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी, ती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अथवा जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

सदर योजनेअंतर्गत येणारा खर्च हा अनिवार्य खर्चांतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पुढील लेखाशिर्षाखाली भागविण्यात येईल.

प्रधान मंत्री पीक विमा योजना Pradhan Mantri Pik Vima Yojana चा महाराष्ट्र शासन अधिकृत शासन आदेश पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावा.

महाराष्ट्र शासन अधिकृत शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱयांना मुदतिाढ देणेबाबत. GR

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version