Site iconSite icon bolbhau.com

Solapur Engineer Recruitment – कनिष्ठ अभियंता पदासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – सोलापूर महानगरपालिकेमध्ये Solapur Engineer Recruitment अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” पदाच्या एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “कनिष्ठ अभियंता” पदाच्या ७६ रिक्त जागा सोलापूर महानगरपालिकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “सोलापूर महानगरपालिकेच्या” https://www.solapurcorporation.gov.in/Default.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १६/१२/२०२३ पासून ते दिनांक ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत https://www.solapurcorporation.gov.in/English/eng%20smc%20recruit.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “ब” (अराजपत्रित) ते गट-” क” मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Solapur Engineer Recruitment महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 16/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 31/12/23
एकूण जागा 76

 

Solapur Engineer Recruitment रिक्त पदे

पद क्र. पद  पदसंख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 2
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
4 केमिस्ट 1
5 फिल्टर इन्पेक्टर 2

 

Solapur Engineer Recruitment शैक्षणिक पात्रता

पद क्र. पद  शैक्षणिक पात्रता
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण,

ब) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणान्यास प्राधान्य.

क) नेमणूकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

ब) यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणान्यास प्राधान्य.

क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) अ) मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.

ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

4 केमिस्ट अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी.

ब) दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य.

5 फिल्टर इन्पेक्टर अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी.

ब) अनुभव धारकास प्राधान्य.

 

Solapur Engineer Recruitment परीक्षा शुल्क
प्रवर्ग खुला प्रवर्ग अन्य इतर सर्व प्रवर्गाकरीता
गट ‘अ’ व ‘ड’ ₹१,०००/- ₹९००/-

 

Solapur Engineer Recruitment वयोमर्यादा

शासन निर्णय क्र. एसआरव्ही २०१५/प्र.क्र.४०४/कार्या- १२, दि. २५/०४/२०१६ नुसार सर्व उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे राहील तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे इतकी राहील.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. 

Solapur Engineer Recruitment महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

UIIC Assistant Recruitment 2023 – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ३०० जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Solapur Engineer Recruitment भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद क्र. पद  पदसंख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 2
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
4 केमिस्ट 1
5 फिल्टर इन्पेक्टर 2

 

२) Solapur Engineer Recruitment भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 16/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 31/12/23
एकूण जागा 76

 

Exit mobile version