Site iconSite icon bolbhau.com

Vivek Bindra News – लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण , असच काहीस घडलं आहे, मोटिवेश्नल स्पीकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विवेक बिंद्राच्या विरोधात पत्नीने केला मारहाणीचा गुन्हा दाखल !!

मुंबई – संपूर्ण समाजाला आपल्या विचाराने मोटिवेट करणाऱ्या Vivek Bindra News विवेक बिंद्रावर त्याच्या पत्नीने मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत. नोएडा पोलिसांनी विवेक बिंद्राच्या मेव्हण्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राच्याविरुद्ध नोएडा सेक्टर-१२६ पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीला गंभीर मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल  Vivek Bindra News करण्यात आला आहे. विवेक बिंद्राच्या मेव्हण्याने म्हणजेच पीडितेच्या भावाने दाखल केलेल्या गुन्ह्या नुसार, सदर गंभीर मारहाणीनंतर त्याच्या बहिणीवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात मागील अनेक दिवस उपचार सुरू होते. विवेक बिंद्राच्या पत्नीच्या कानाचा पडदाही फाटल्याचे दिसून येत आहे. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करणार आहेत. विवेक बिंद्राच्या विरोधामध्ये १४ डिसेंबर, २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रसिद्ध मोटिवेशन स्पीकर Vivek Bindra News विवेक बिंद्रा यांच्याविरुद्ध सेक्टर-126 पोलीस ठाण्यात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेच्या भावाने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मारहाणीनंतर महिलेवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात अनेक दिवस उपचार सुरू होते.त्याच्या कानाचा पडदाही फुटला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.विवेक बिंद्रा विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विवेक बिंद्रा यांचे लग्न ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी ललित मानगर या प्रसिद्ध हॉटेलमध्ये झाला होते. त्यांच्या लग्नानंतर सुमारे एक महिनाभरानंतर ०७ डिसेंबर, २०२३ रोजी पहाटे २.३० ते ३ या वेळेच्या दरम्यान विवेक बिंद्राच्या आई प्रभा यांच्या सोबत त्याच्या पत्नीचा काही कारणावरून भांडण झाले होते. सदर विषयी विवेक बिंद्राच्या नवविवाहित पत्नीनेमध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, विवेकने बिंद्राने त्यांच्या पत्नीला खोलीत कोंडले. Vivek Bindra News

दाखल केल्या गुन्ह्यानुसार, विवेकने त्यांच्या पत्नीला म्हणजेच यानिकाला प्रचंड शिवीगाळ करीत भयंकर मारहाण केली. सदरच्या मारहाणीमुळे त्या महिलेच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्यांच्या कानाने ऐकू येत नाही. त्यांचे केस जोर जोरात ओढल्याने महिलेच्या डोक्यावरही गंभीर प्रकारची जखम निर्माण झाली आहे. तसेच यादरम्यान विवेक बिंद्राने आपल्या पत्नीचा मोबाईलही फोडला. Vivek Bindra News विवेक बिंद्राच्या जखमी पत्नीवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात मागील अनेक दिवस उपचार सुरू होते.

 

Exit mobile version