Lpg Gas Cylinder Price Reduced – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा ! » Bolbhau.com Lpg Gas Cylinder Price Reduced – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा ! » Bolbhau.com

 घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट !  केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

 घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट !  केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

 २९ ऑगस्ट, २०२३ पासून देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती २०० रूपयांनी घट करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे.

७५ लाखांच्या आसपास असणाऱ्या महिलांना मोफत उज्ज्वला गॅस सिलेंडर कनेक्शन देण्यात येणार असल्याचे हि केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे. 

उज्वला गॅस कनेक्शन बरोबर सर्व वस्तू म्हणजे गॅस वाहक पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. 

आतापर्यंत उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवरती २०० रुपये अनुदान देण्यात येत होते, त्या अनुदानामध्ये आणखी २०० रुपयांचा अतिरिक्त अनुदानाचा लाभ सर्व उज्वला गॅस धारकांना देण्यात येणार आहे.

यापुढे उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक सिलेंडरमध्ये ४०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

सध्या देशामध्ये ३३ कोटी गॅस सिलेंडर धारक आहेत. त्यामध्ये भर म्हणजे आणखी ७५ लाख नवीन गॅस कनेक्शन संपूर्ण देशामध्ये देण्यात येणार आहेत.  

सरकार उज्वला गॅस सिलेंडरकरिता प्रत्येक लाभार्थ्यांमागे ३६०० रुपयांच्या आसपास खर्च करीत 

आज भारत देशातील सुमारे ३३ कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन असल्याचं केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकुर यांनी सांगितलं आहे. 

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बुधवारपासून म्हणजे २९ ऑगस्ट, २०२३ पासून , गॅस सिलेंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत खाली येणार आहे.

आमच्या स्टोरीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!