मुंबई – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे Indian Oil Corporation Bharti अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस , पदवीधर अप्रेंटिस” या पदांच्या एकूण १६०३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस” पदांच्या १६०३ रिक्त जागा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या” https://www.iocl.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १६/१२/२०२३ पासून ते दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पर्यंत https://www.iocl.com/apprenticeships या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Indian Oil Corporation Bharti रिक्त पदे
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस , पदवीधन अप्रेंटिस पदांच्या एकुण 1603 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Trade Apprentice , Technician Apprentice & Graduate Apprentice Post , Number of Post Vacancy – 1603 )
Indian Oil Corporation Bharti शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण / आयटीआय / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर टेक्निशियन अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पदवीधर अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे B.COM / BA / BBA /B.SC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
Indian Oil Corporation Bharti वयोमर्यादा
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
Indian Oil Corporation Bharti अर्ज प्रक्रिया / अर्ज शुल्क
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.iocl.com/apprenticeships या संकेतस्थळावर दिनांक 16 डिसेंबर पासुन 05 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत.