मुंबई – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये BECIL Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मधील विविध १२९ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडच्या https://www.becil.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०६/१०/२०२३ पासून ते दिनांक १९/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://becilregistration.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
BECIL Recruitment 2023 – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड भरती २०२३ – रिक्त पदे
एकूण 129 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी becilregistration.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. कृपया ऑनलाइन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा.
उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवा.
जाहिरात 1 – Broadcast Engineering Consultant India Limited Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application
अधिकृत वेबसाईट – www.becil.com