मुंबई – महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये एकूण १३ हजार, ३९१ रिक्त आहेत. तसेच सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये ८७६ पदे रिक्त आहेत. यासर्वांमधील गट ‘अ’ व गट ‘ब ‘ मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु असून येणाऱ्या काळामध्ये ( Government Hospital Recruitment ) वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिलेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये (Government Hospital Recruitment ) रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलेले आहे.
सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गामधील ९१, सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ रिक्त पदे भरण्यात आलेली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आलेली आहेत. तर उर्वरित रिक्त पदे लवकरच भरण्यात येत आहेत.
गट ‘क’ संवर्गांमधील ५१८० पदे भरण्याकरिता टी.सी.एस.आय.ओ.एन. (T.C.S.I.O.N.) कंपनीकडून स्पर्धा घेण्यात आलेली आहे. (Government Hospital Recruitment) गट ‘ड ‘ संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयातील रिक्त पदे (Government Hospital Recruitment) एमपीएसीमार्फत भरण्यात येणार !
- महाराष्ट्र राज्य सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आलेले आहेत.
- सदर भरतीविषयाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आलेले आहेत. हि रिक्त पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सरकारी दंत महाविद्यालयांमधील (Government Hospital Recruitment ) रिक्त पदे
पदाचे नाव (Name of Posts ) |
रिक्त पदांची संख्या (Number of Vacant Posts ) |
१) अधिष्ठाता |
८ |
२) प्राध्यापक |
२४५ |
३) सहयोगी प्राध्यापक |
४०० |
४) सहायक प्राध्यापक |
१००८ |
५) संवर्ग गट ‘क’ मधील पदे |
७७५६ |
६) संवर्ग गट ‘ड’ मधील पदे |
३९७४ |
एकूण रिक्त पदे |
१३३९१ |
महाराष्ट्र सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील (Government Hospital Recruitment ) रिक्त पदे
पदाचे नाव (Name of Posts ) |
रिक्त पदांची संख्या (Number of Vacant Posts ) |
१) अधिष्ठाता |
२ |
२) प्राध्यापक |
२६ |
३) सहयोगी प्राध्यापक |
४४ |
४) सहायक प्राध्यापक |
८६ |
५) संवर्ग गट ‘क’ मधील पदे |
५१० |
६) संवर्ग गट ‘ड’ मधील पदे |
२१० |
एकूण रिक्त पदे |
८७६ |
Government Hospital Recruitment सोबत हेही वाचा –