Karagruh Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये Karagruh Vibhag Bharti 2024 अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण २५५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये” विविध पदाच्या २५५ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या http://mahaprisons.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०१/२०२४ पासून ते दिनांक २१/०१/२०२४ रोजी पर्यंत http://mahaprisons.gov.in/Uploads/pdf_GR/de518aab-8231-4c5a-8825-c146278ae346Prison_Recruitment_.pdf या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Karagruh Vibhag Bharti 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 01/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 21/01/24
एकूण जागा 255

 

Karagruh Vibhag Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 4
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्रनिदेशक 02
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहार काम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 1
पंजा व गालीचा निदेशक 1
ब्रेललिपि निदेशक 1
जोडारी 1
प्रिप्रेटरी 1
मिलींग पर्यवेक्षक 1
शारिरिक कवायत निदेशक 1
शारिरिक शिक्षण निदेशक 1

 

Karagruh Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता  

पद  शैक्षणिक पात्रता
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणी एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड | उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण | मराठी/इंग्रजी ४० प्रति शब्द मि.
मिश्रक एसएससी / एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षक एसएससी / एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका | उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)
शिवणकाम निदेशक एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य | मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
सुतारकाम निदेशक एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन | वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण | झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा | हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार एसएससी / एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )
चर्मकला निदेशक एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व | प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्रनिदेशक एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक एसएससी / एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
करवत्या चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहार काम निदेशक एसएससी / एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभाग अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन | स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारी एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षक एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य
पंजा व गालीचा निदेशक एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपि निदेशक एसएससी / शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारी एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरी एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बापिंग / सायजिंग / वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलींग पर्यवेक्षक एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारिरिक कवायत निदेशक एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथवा तत्सम महाराष्ट्र | शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
शारिरिक शिक्षण निदेशक एसएससी / शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य

 

Karagruh Vibhag Bharti 2024 वयोमर्यादा
  • वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Karagruh Vibhag Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment