Mgnrega Palghar Bharti 2024 – मनरेगा अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

मुंबई – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना Mgnrega Palghar Bharti 2024 अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. हि नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर करण्यात येणार आहे. यासाठी विहित पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ०५/०१/२०२४ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व सदर पात्रता व आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.palghar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर पदावर १०० पात्र उमेदवारांची पॅनलवर नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात दिनांक २२/०१/२०२४ रोजी पर्यंत सायंकाळी ५. ०० वाजता पर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून ) पोहोचतील अशा बेताने सादर करावे. विहित कागदपत्रे सोबत नसलेले व अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Table of Contents

Mgnrega Palghar Bharti 2024

Mgnrega Palghar Bharti 2024 नियुक्तीच्या अटी व शर्ती

१. साधन व्यक्ती पदासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.

२. साधन व्यक्ती पदासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असावे. कमाल वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.

३. ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान १० वी पास असावा. १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान ८ वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल यासाठी कमात शिक्षणाची मर्यादा नाही.

४. सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवरांचा प्राधान्याने विचार केला जाईल…

५ साधन व्यक्तींची निवड करतांना पुढील गटातील व्यक्ती यांना प्राधान्य राहील.

Mgnrega Palghar Bharti 2024 अर्ज करण्याची वेळ आणि ठिकाण

  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या नमुन्यात आपला अर्ज स्वः हस्ताक्षरात भरून आवश्यक कागदपत्रासह रूम न. १११. पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या कार्यालयात दिनांक 22/01/2024 पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत. विहित कागदपत्रे सोबत नसलेले व अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्जाचा नमुना येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

Forest Guard Result 2024 – महाराष्ट्र राज्य वनरक्षक भरतीचा निकाल झाला जाहीर ! यादीत पहा आपले नाव !!

  1. Mgnrega Palghar Bharti 2024 भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता ?
  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या नमुन्यात आपला अर्ज स्वः हस्ताक्षरात भरून आवश्यक कागदपत्रासह रूम न. १११. पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या कार्यालयात दिनांक 22/01/2024 पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत. विहित कागदपत्रे सोबत नसलेले व अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Leave a Comment