Mumbai Customs Bharti 2024 – सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयात वाहनचालक पदासाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयात Mumbai Customs Bharti 2024 अंतर्गत “वाहन चालक” या पदांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयात “वाहन चालक” पदाच्या २८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त साध्या पोस्टद्वारे किंवा स्पीड पोस्ट द्वारे पोहचेल अशा पद्धतीने करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयाच्या https://www.mumbaicustomszone1.gov.in/home/Index या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०२/२०२४ पासून ते दिनांक २०/०२/२०२४ रोजी सायंकाळी १८.:०० पर्यंत अर्ज पाठविण्याचा पत्यावर पाठवायचा आहे. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Mumbai Customs Bharti 2024

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :-  20.02.2024 रोजी किंवा त्यापूर्वी 18.00 तासांपर्यंत.

पदाचे नाव :- कार स्टाफ ड्राइव्हर (OG)

एकूण जागा :- 28

भरतीसाठी वयोमर्यादा :-

  • 18 ते 27 वर्षे (थेट खुल्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे)
  •  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

आवश्यक पात्रता

i) मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे;

ii) मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावा);

iii) किमान तीन (3) वर्षे मोटार कार चालविण्याचा अनुभव आणि

iv) मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

फी :- 0/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Deputy Commissioner of Customs, (Personnel & Establishment) Office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Leave a Comment