Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

मुंबई – मा. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ क्र. १ येथील न्याय निवाड्यातील परिच्छेद क्रमांक ५९ मधील निर्देशांच्या त्याचप्रमाणे मा. राज्य मानवी हक्क आयोगाकडील सुमोटो याचिकेवरील सुनावणीच्या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांच्या अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतिगृहे व प्रशिक्षण केंद्र (कार्यशाळा ), अनाथ मतिमंदाकरिताची बालगृहे संलग्न विशेष शाळा व संलग्न कार्यशाळांमधील रिक्त असलेली शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील पदे, वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०४ मे. २०२० मधून निर्बंध मुक्त करून तातडीने सरळसेवेने भारण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या Divyang Kalyan Vibhag दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत सर्व प्रवर्गामधील दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थानमार्फत राज्यामध्ये एकूण  ९३२ अनुदानित दिव्यांग मुलांच्या शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद मुलांसाठी बालगृहे चालवली जातात. या विभागाअंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील १९१२ विविध पदे भरण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

Table of Contents

Divyang Kalyan Vibhag

Divyang Kalyan Vibhag शासन निर्णय –

वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये स्थापित उच्चस्तर सचिव समितीसमोर शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील तसेच शासनाचे अंगीकृत उपक्रम, महामंडळे, अनुदानित संस्था, इ . उपक्रमांमधील पदे नव्याने निर्माण करणे, व्यपगत ठरविणे, व्यपगत ठरविलेली पदे पुनर्जीवित करणे, इ. बाबतचे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी शासन निर्णय दिनांक ९ जून, २०१७ अन्वये स्थापित करण्यात आलेल्या उपसमितीच्या शिफारशीने सदरचे प्रस्ताव उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार उक्त उपसमितीच्या दिनांक १८ जानेवारी, २०२३ रोजीच्या बैठक क्रमांक १ /२०२३ अन्वये, राज्यातील दिव्यांगांच्या अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र (कार्यशाळा ), अनाथ मतिमंदाकरिताची बालगृहे संलग्न विशेष शाळा व संलग्न कार्यशाळा यामंधील रिक्त असलेली शिक्षक संवर्गातील रिक्त पदे व दिनांक २० मार्च, २०२३ रोजीच्या बैठक क्रमांक ०३/२०२३ अन्वये उपरोक्त उपक्रमातील रिक्त असलेली शिक्षक / शिक्षकेतर संवर्गातील रिक्त पदे, वित्त आयोगाच्या शासन निर्णय दिनांक ०४ मे, २०२० च्या निर्बंधातून मुक्त करण्यास खालीलप्रमाणे शिथिलता दिलेली आहे :-

१) वित्त विभागाच्या उपसमितीच्या दिनांक १८ जानेवारी, २०२३ रोजीच्या बैठकीतील सूचनेनुसार Divyang Kalyan Vibhag उपरोक्त उपक्रमांतील शासन निर्णय दिनांक १८ ऑगस्ट, २००४ च्या आकृतिबंधानुसार अनुज्ञेय ठरणारी शिक्षकीय संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी वित्त विभागाच्या दिनांक ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयातील निर्बंधातून शिथिलता देण्यात आली आहे.

२) उपरोक्त उपक्रमांतील शिक्षकेतर संवर्गातील खालील तक्ता “अ” मध्ये दर्शविल्याप्रमाणे Divyang Kalyan Vibhag नियमित तत्त्वावरील एकूण ५०८ रिक्त पदे व सदर अनुदानित विशेष शाळा / कार्यशाळा व संलग्न वसतिगृहे यांचा सुधारित आकृतिबंध अंतिम होईपर्यंत खालील तक्ता “ब” मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण २३७ मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा / पदे भरण्यास मान्यता देण्यात आली .

Divyang Kalyan Vibhag तक्ता “अ ” भरण्यास मान्यता दिलेली पदे :

अ.क्र .

पदनाम

पदे भरतीस मान्यता दिलेली पद संख्या

१)

शिक्षक

११६७

२)

अंध – चलन वळण अवयव निदेशक

०४

३)

मूकबधिर – वाचा उपचार तज्ञ

३७

४)

मतिमंद – मानसशास्त्रज्ञ / व्यवसाय उपचार तज्ज्ञ / भौतिकोचार तज्ञ, स्पास्टिक

४१

५)

अस्थिव्यंग – फिजिओ थेरपिस्ट / व्यवसायोपचार तज्ञ

२०

६)

वसतिगृह अधीक्षक / गृहपाल, परिचारिका (मतिमंद शाळेकरिता ) या संवर्गातील एकूण ११३ रिक्त पदांच्या ५०%

५६

७)

काळजीवाहक

३५०

एकूण

१६७५

 

Divyang Kalyan Vibhag तक्ता “ब ” बाह्यस्त्रोताद्वारे घ्यावयाच्या सेवा भरण्यास मान्यता दिलेली पदे :

अ.क्र .

सेवा

मनुष्यबळ संख्या

१)

मानद वैद्यकीय अधिकारी व पुनर्वसन सामाजिक कार्यकर्ता नि सेवायोजन अधिकारी

१३४

२)

वाहनचालक, बहुउद्देशीय गट – ड कर्मचारी (वाहन परिचर, मदतनीस, सफाईगार, पहारेकरी, शिपाई ) २०६ रिक्त पदांपैकी ५०%

१०३

एकूण

२३७

 

टीप – बाह्यस्त्रोतांद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या दिनांक २७/०४/२०२२ च्या Divyang Kalyan Vibhag शासन निर्णयातील तरतुदीचे अनुपालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

२) उपरोक्त १ (१) मधील नमूद निर्बंध शिथिलतेमुळे विभागाची ११६७ शिक्षक संवर्गाची पदे भरण्याच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त आहे.

३) उपरोक मुद्दा १ व २ येथे नमूद रिक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरतीसंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

अ ) आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांनी प्रवर्ग निहाय Divyang Kalyan Vibhag एकत्रित प्रस्ताव खालील नमुन्यामध्ये दिनांक १० ऑगस्ट, २०२३ पर्यंत विभास सादर करावा.

अ. क्र.

संस्थेचे नाव अनुदानित शाळा / कर्मशाळा / बालगृह इ. चे नाव व पत्ता
शासन निर्णय दिनांक १८ऑगस्ट

२००४ अनुसार (पदनामनिहाय )

मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

नोंदणी प्रमाणपत्रांच्या वैधतेचा कालावधी

 
४ (अ ) ४ (ब ) ४ (क )

 

ब – आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे Divyang Kalyan Vibhag यांच्याकडून प्राप्त रिक्त पदांच्या प्रस्तावाची पदभरतीच्या नियमानुसार तपासणी करून शासन स्तरावरून दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत तपासणीमध्ये अनुज्ञेय ठरलेल्या पदांना शाळा / कार्यशाळा निहाय ना – हरकत प्रमाणपत्र निर्गमित करील.

क) शासनाकडून रिक्त पदे भरण्याकरिता ना – हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित Divyang Kalyan Vibhag सक्षम प्राधिकारी तथा स्वयंसेवी पालक संस्थेने ना – हरकत प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांत शासनाने विहित केलेल्या सरळसेवा भरती विषयक नियमांचे पालन करून भरती प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्यामुळे आयुक्तालयाने व संस्थांनी ना – हरकत प्रमाणपत्र संस्थांना दिल्याच्या दिनांकाची योग्य नोंद ठेवावी.

३ – सदर भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित स्वयंसेवी पालक संस्थेची राहील .

४ – समितीने मान्यता दिलेल्या Divyang Kalyan Vibhag सर्व अनुज्ञेय पदांची भरती प्रक्रिया संबंधित संस्थेने विहित वेळेत पूर्ण केल्यानंतर एक महिन्याच्या आत याबाबतचा अहवाल विभागास सादर करण्याची जबाबदारी आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांची राहील.

५- सदरचा शासन निर्णय, वित्त विभागाचे पत्र क्रमांक – पदनि – २०२३ / प्र. क्र . १६ / आपुक, दि . २७ मार्च, २०२३ सोबतच्या नवीन पदनिर्मिती / पदांचे पुनुरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करून शिफारशी करण्यासाठी तसेच काल्पनिक पदे निर्माण करण्यास व रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्याकरीता गठीत केलेल्या उपसमितीच्या दि. २०/०३/२०२३ रोजी झालेल्या सन २०२३ मधील Divyang Kalyan Vibhag तिसऱ्या बैठकीच्या इतिवृत्तास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६- सदर शासन निर्णय  महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक 202307271230102535 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

सोबत हेही वाचा

१) Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..!

२) India Post Payments Bank Recruitment – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा..!

३) Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय !

४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

५) Indian Air Force Bharti 2023 – For AgniveerVayu – भारतीय वायू सेनेमध्ये तरुण / तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘अग्निवीरवायू पदासाठी भरती  सुरु, लगेच करा अर्ज ..!

६) Pradhan Mantri Pik Vima Yojana – प्रधानमंत्री पीक विमा फॉर्म भरण्यास मुदतवाढ – “०३ ऑगस्ट, २०२३ पर्यंत”, याची नोंद घ्यावी !

 

Leave a Comment