Mahatribal Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! 602 जागा उपलब्ध ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये  Mahatribal Bharti 2023 अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ६०२ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ६०२ रिक्त जागा महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या” https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 23/11/2023 पासून ते दिनांक 13/12/2023 रोजी पर्यंत https://tribal.maharashtra.gov.inया लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Mahatribal Bharti 2023

Mahatribal Bharti 2023 रिक्त पदे 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
उच्चश्रेणी लघुलेखक 03
निम्नश्रेणी लघुलेखक 13
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14
संशोधन सहाय्यक 17
उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187
लघुटंकलेखक 5
गृहपाल (पुरुष) 43
गृहपाल (स्त्री) 25
अधीक्षक (पुरुष) 26
अधीक्षक (स्त्री) 48
ग्रंथपाल 38
प्रयोगशाळा सहाय्यक 29
आदिवासी विकास निरीक्षक 08
सहाय्यक ग्रंथपाल 01
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48
एकूण 602

 

Mahatribal Bharti 2023 महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 23/11/23 दुपारी १५.०० वा. पासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 13/12/23 रात्री २३.५५ पर्यंत

 

१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेशामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.

२) ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्ग निहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शती, शैक्षणिक अहंता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशील https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

३) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उद्धवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.

Mahatribal Bharti 2023

हे सुध्दा वाचा

SBI CBO Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सीबीओ पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! ५२८० जागा उपलब्ध, लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Mahatribal Bharti 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
उच्चश्रेणी लघुलेखक 03
निम्नश्रेणी लघुलेखक 13
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14
संशोधन सहाय्यक 17
उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187
लघुटंकलेखक 5
गृहपाल (पुरुष) 43
गृहपाल (स्त्री) 25
अधीक्षक (पुरुष) 26
अधीक्षक (स्त्री) 48
ग्रंथपाल 38
प्रयोगशाळा सहाय्यक 29
आदिवासी विकास निरीक्षक 08
सहाय्यक ग्रंथपाल 01
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48
एकूण 602

 

२) Mahatribal Bharti 2023 भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 23/11/23 दुपारी १५.०० वा. पासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 13/12/23 रात्री २३.५५ पर्यंत

Leave a Comment