मुंबई – महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागात Teacher Recruitment Advertisement 2024 अंतर्गत “शिक्षक” या पदांच्या एकूण २१ हजार, ६७८ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्याच्या शिक्षण विभागात “शिक्षक“ पदाच्या २१ हजार, ६७८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतीत १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील दोन हजार ९५१ पदे, नगरपालिकांतीत ४७७, नगर परिषदांतील एक हजार १२३, खासगी अनुदानित पाच हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह चार हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार पवित्र संकेतस्थळाच्या https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०८/०२/२०२४ पासून होणार आहे. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
शिक्षक भरती संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी
माध्यमनिहाय जागांमध्ये सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यात
मराठी = १८ हजार ३७३
इंग्रजी = ९३१
उर्दू = १ हजार ८५०
हिंदी = ४१०
गुजराती = १२
कन्नड = ८८
तमीळ = ८
बंगाली = ४
तेलुगू = २ जागा
साधन व्यक्तीबाबत…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजीचे बळकटीकरण करण्यासाठी साधन व्यक्ती नियुक्त करण्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक याप्रमाणे, परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
गटनिहाय पदे
- पहिली ते पाचवी – १० हजार २४०,
- सहावी ते आठवी – ८ हजार १२७
- नववी ते दहावी – २ हजार १७६
- अकरावी ते बारावी – १ हजार १३५