Drought Declared in Maharashtra 2023 – महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर ! आपला तालुका त्यात आहे का? ते पहा.

मुंबई – महाराष्ट्र राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या खरीप हंगामामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी, आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. Drought Declared in Maharashtra 2023

Drought Declared in Maharashtra 2023

महाराष्ट्र राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांत पाऊस कमी झालेला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते सर्व निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य प्रमाणात सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल. Drought Declared in Maharashtra 2023

आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाकडून पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

हे सुद्धा पहा

महाराष्ट्र राज्यात यंदा पावसाच्या प्रमाणात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून, रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत फक्त १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

Drought Declared in Maharashtra 2023 – महाराष्ट्रातील जिल्हानिहाय दुष्काळ जाहीर झालेले ४० तालुके पुढील प्रमाणे :

१) नंदुरबार : नंदुरबार

२) जळगाव : चाळीसगाव

३) जालना : भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा

४) छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर

५) नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला

६) पुणे: पुरंदर, सासवड, बारामती

७) बीड : वडवनी, धारूर, अंबाजोगाई

८) लातूर : रेणापूर

९) धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा,

१०) सोलापूर : बार्शी, माळशिरस, सांगोला.

११) धुळे : सिंदखेडा

१२) बुलढाणा : बुलढाणा, लोणार

१३) पुणे : शिरूर घोड नदी, दौंड, इंदापूर

१४) सोलापूर : करमाळा, माढा

१५) सातारा : वाई, खंडाळा

१६) कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज

१७) सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज

Drought Declared in Maharashtra 2023

Leave a Comment