मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील खालील विवरणपत्रात नमूद विविध विषयातील “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब” या संवर्गातील ७६५ पदांच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब” पदाच्या ७६५ रिक्त जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या” https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १२/१२/२०२३ पासून ते दिनांक ०१/०१/२०२४ रोजी पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
MPSC Bharti रिक्त पदे
- पद :- विविध विषयातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गातील पदे – 765
MPSC Bharti शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता :- M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.
MPSC Bharti वयोमर्यादा
- वयोमर्यादा :- 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
MPSC Bharti अर्ज शुल्क
अर्ज शुल्क (रुपये) :-
- अराखीव (खुला)- रुपये ७९९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाव / दिव्यांग रुपये ४४९/-
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
MPSC Bharti महत्वाची लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
MPSC Bharti महत्वाच्या तारखा
अर्ज सादर करावयाचा कालावधी | दिनांक १२ डिसेंबर, २०२३ रोजी १४.०० ते दिनांक ०१ जानेवारी, २०२४ रोजी २३.५९ |
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक | दिनांक ०१ जानेवारी, २०२४ रोजी २३.५९ |
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक ०३ जानेवारी २०१४ रोजी २३.५९ |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक ०४ जानेवारी, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |