Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती निर्णय जाहीर. लवकरच होणार भरती … !

सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना माहिती असेलच की, “पुणे तिथे काय उणे”; या म्हणीप्रमाणे पुणे या शहराचा विकास सुध्दा फार वेगाने होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे पुणे महानगरपालिका क्षेत्राची हद्द देखील आता वाढवण्यात आलेली आहे. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे साहजिकच पुणे शहराचा भूप्रदेश देखील वाढला असणार. या सर्वांचा परिणाम असा झाला की, याचा कामाचा ताण येथील प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनातर्फे Pune Mahanagarpalika Bharti 2023 – अंतर्गत ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच सात उपकामगार अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्येकी एका जागेसाठी पुढील काही दिवसांमध्ये भरती प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे.

pune mahanagarpalika bharti 2023

गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने भरतीवरील स्थगिती उठविल्याने प्रशासनातर्फे Pune Mahanagarpalika Bharti २०२३ अंतर्गत कर्मचारी भरती प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांच्या ४४८ जागांची भरती प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ९ पदांवरील ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची नुकतीच ऑनलाइन परीक्षा झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल, भरती सुरू असताना आता ११० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सात उपकामगार अधिकारी, एक उपमुख्य अग्निशमन अधिकारी.

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत एक विभागीय अग्निशमन अधिकारी, एक सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयबीपीएस संस्थेसोबत पुढील चर्चा करून या पदांसाठी जुलै महिनाअखेरपर्यंत जाहिरात काढून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत.

महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विविध विभागांवर त्याचा ताण येत आहे. त्यामुळे Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2023

 

Leave a Comment