Talathi Bharti 2023 – तलाठी भरती २०२३ अंतर्गत विक्रमी साडेअकरा लाख अर्ज दाखल …!

पुणे – महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या ( Talathi Bharti 2023 ) महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील ‘तलाठी’ या पदासाठी विक्रमी साडेअकरा लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या दाखल अर्जातील दहा लाख अर्जदार उमेदवारांनी प्रवेश फी भरलेली आहे. तलाठी या पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे आता महाराष्ट्र शासन राज्यातील विविध केंद्रांवर तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेणार आहे. दररोज कमीत कमी ५० हजार ते ६० हजार उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. हि परीक्षा किमान २० दिवस चालेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

Table of Contents

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 – अर्जांची संख्या जास्त असल्याने वीस दिवस चालणार परीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने गेल्या काही वर्षांत एवढी मोठी (Talathi Bharti 2023 ) तलाठी भरती काढली नव्हती. त्यामुळे या वर्षी ४ हजार ६४४ एवढे (Talathi Bharti 2023) तलाठी पदांसाठी पूर्ण राज्यभरातून अर्ज मागिवले होते. सर्व अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. Talathi Bharti 2023 – तलाठी अर्ज भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आलेली होती. तर संबंधित अर्ज भरण्यासाठी खुला गट १ हजार रुपये, तर इतर आरक्षित गटांसाठी ९०० रुपये परीक्षा फी ठेवण्यात आली होती. वास्तविक पाहता १७ जुलै, २०२३ ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख मुदत देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांच्या आग्रहास्तव एक दिवस (१८ जुलै, २०२३) मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. Talathi Bharti 2023 – या पदासाठी ११ लाख ५० हजार अर्ज प्राप्त झाले होते. दाखल अर्जा पैकी १० लाख उमेदवारांनी अर्जाची फी भरली आहे. फी भरण्यासाठी २० जुलै, २०२३ मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी फी भरली आहे. तेच उमेदवार सदर परीक्षेस पात्र असणार आहेत. दरम्यान, प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर होणार आहे.

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 – तलाठी पदाच्या भरतीसाठी विक्रमी ११ लाख ५० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सुमारे १० लाख उमेवारांनी फी भरलेली आहे. अर्जाची हि संख्या लक्षात घेता, सदरची परीक्षा तीन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. किमान वीस दिवस हि (Talathi Bharti 2023) परीक्षा चालणार आहे. – आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख

 

Leave a Comment