Rashtriya Bal Swasthya Karyakram – १८ वर्षापर्यंच्या सर्व बालकांवर होणाऱ्या मोठ्या शस्त्रक्रिया आता होणार मोफत ..! हृदय, न्यूरो, क्वॅक्लियर इंप्लांट इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश

पुणे : शून्य ते १८ वर्ष वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम‘ (आर. बी. एस. के. )Rashtriya Bal Swasthya Karyakram – कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याबाबतचा करार – महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलबरोबर केलेला आहे. यामुळे बालकांसाठी खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना नाही.

Contents hide
1 या करारानुसार शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी Rashtriya Bal Swasthya Karyakram अंतर्गत – नऱ्हे येथील काशीबाई नवले रुग्णालयामध्ये जन्मजात हृदयरोग (कंजेनायटल हार्ट डिसीज), अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी ), प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी ), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी ), कानाचे उपचार (इएनटी ) आणि डोळ्यांचे उपचार मोफत होणार आहेत.

Table of Contents

या करारानुसार शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी Rashtriya Bal Swasthya Karyakram अंतर्गत – नऱ्हे येथील काशीबाई नवले रुग्णालयामध्ये जन्मजात हृदयरोग (कंजेनायटल हार्ट डिसीज), अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी ), प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी ), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी ), कानाचे उपचार (इएनटी ) आणि डोळ्यांचे उपचार मोफत होणार आहेत.

 

Rashtriya Bal Swasthya Karyakram

आदित्य बिर्ला रुग्णालयामध्येही प्लास्टिक सर्जरी (फाटलेली, दुभंगलेली टाळू), हृदयशल्यचिकित्सा, अस्थिरोग शस्त्रक्रिया (आर्थोपेडिक सर्जरी ), मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी ), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी ), ऐकू येण्यासाठी क्वॅक्लिअर इंप्लांट आणि डोळ्यांचे उपचार हे उपचार होणार आहेत. हे उपचार झाल्यावर त्यांचे पैसे Rashtriya Bal Swasthya Karyakram अंतर्गत – आरबीएसकेने ठरवलेल्या दरांनुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचा करार २३ मे, २०२३ रोजी कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केला आहे.

Rashtriya Bal Swasthya Karyakram अंतर्गत सर्व बालकांना उपचार मोफत २०२३ – कोठे कराल संपर्क ?

  • यासाठी तुमच्या येथील आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी.

सर्व बालकांना उपचार मोफत २०२३ – Rashtriya Bal Swasthya Karyakram – अंतर्गत कोण आहे पात्र ?

या उपचारांसाठी शून्य ते १८ वर्ष वयोगटातील सर्व बालके पात्र आहेत. त्यासाठी त्या बालकाचा शाळा शिकत असलेला अंगणवाडी किंवा शाळेचा दाखला, डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्यचिकीत्सकाची मंजुरी ही कागदपत्रे लागतील.

सर्व बालकांना उपचार मोफत २०२३ – Rashtriya Bal Swasthya Karyakram अंतर्गत मुंबईतही होणार उपचार
पुण्यासह नाशिक, वर्धा आणि मुंबईतही यासाठी रुग्णालय देण्यात आले आहेत. तेथेही उपचार होतील. नाशिक येथे सुयोग्य रुग्णालय चोपडा मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर, मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि वर्धा येथे आचार्य विनोबा भावे रूरल रुग्णालय यांचा समावेश आहे. धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये जन्मजात हृदयरोगावर उपचार होतील, तर इतर रुग्णालयामध्ये नेहमीप्रमाणे हृदयरोगासह इतरही उपचार होतील.

Rashtriya Bal Swasthya Karyakram – अंतर्गत येणाऱ्या महत्वाच्या रुग्णालयांची लिंक्स पुढे दिलेल्या आहेत.

१- पुणे – काशीबाई नवले हॉस्पिटल
२- पिंपरी चिंचवड – आदित्य बिर्ला हॉस्पिटल
३- नाशिक – सुयोग्य रुग्णालयचोपडा मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर,
४- मुंबई – कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय
५- वर्धा – आचार्य विनोबा भावे रूरल रुग्णालय

Leave a Comment