मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये १९६० नंतर प्रथमच राज्य पोलीस दलासाठी नवीन आकृतिबंध तयार करून १८ हजार पदांची भरती सुरु केली आहे. Police Bharti 2023 नुसार आतापर्यंतची ही सर्वांत विक्रमी भरती आहे. महाराष्ट्र राज्य सरकारला यापेक्षा अधिक पदांची भरती करायची होती. पण राज्यामध्ये त्याअनुषंगाने प्रशिक्षण सुविधा उपलब्ध नसल्याने अगोदर त्यामध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य विधानसभेत दिली. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कधीही राज्य पोलिसांची कंत्राटी भरती केली जाणार नाही, यागोष्टीचा पुनर्रउच्चरही त्यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात सुरु असलेल्या Police Bharti 2023 भरती प्रक्रियेची माहिती दिली. “मुंबई पोलीस दल” आणि “पुणे पोलीस दल “यामध्ये १० हजार पदे रिक्त आहेत. यामुळे मुंबई पोलिसांच्या विनंतीनुसार सुरक्षा महामंडळातील काही पोलीस त्यांना ११ महिन्यांसाठी देत आहोत. कुठलाही बाहेरचा कंत्राटदार यामध्ये असणार नाही. १९६० नंतर प्रथमच महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना केली आहे. १९६० चा आकृतिबंध आजपर्यंत वापरला जात आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अधिकारी – कर्मचारी असावेत ? यासाठी नवीन मणके महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेली आहेत. १९६० च्या लोकसंख्येनुसार नव्हे, तर त्यासाठी सन २०२३ लोकसंख्येची आकडेवारी विचारात घेतली जाणार आहे., असे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्यामध्ये “महिला अत्याचारांच्या बाबतीत प्रतिलाख लोकसंख्येमागे विचार करायचा झाल्यास Police Bharti 2023 महाराष्ट्र हे देशात बाराव्या क्रमांकावर आहे.
महिला बेपत्ता होत असल्या तरी, त्या परत येण्याचे प्रमाण महाराष्ट्र राज्यामध्ये ९० टक्क्यांपर्यंत आहे. अर्थात उर्वरित १० टक्के महिलांना देखील शोधण्यात येईल. शक्ती कायदा केंद्र सरकारकडे प्रलंबित असून, त्याबाबत योग्य तो पाठपुरावा चालू आहे.
महाराष्ट्रातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी Police Bharti 2023 यंत्रणा : –
महाराष्ट्र राज्यात सायबर क्राईम रोखण्यासाठी अत्याधुनिक असा इंटिग्रेटेड सायबर प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. Police Bharti 2023 पुढच्या सहा महिन्यांमध्ये हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. ” या यंत्रणेमध्ये पोलीस, बँक आदी सर्व संबंधित यंत्रणांचा समावेश असेल. सायबर गुन्ह्यांतील पैसे एक तासात दहा खात्यानंमध्ये फिरून विदेशांमध्ये पाठवले जातात. त्याचा छडाही लागत नाही. सर्वजण एकाच प्लॅटफॉर्मवर असतील तर, असे गुन्हे रोखता येऊ शकतील. प्रशिक्षित वर्ग तयार केला जात आहे. ऑउटसोर्सिंगचे मॉडेलही तयार केले आहे. अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.