Maharashtra Police Recruitment 2023 – महाराष्ट्र ९८ हजार पोलिसांची मेगा भरती ! तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!

मुंबई – महाराष्ट्र राज्यात पोलीस कर्मचारी आणि लोकसंख्या याचे प्रमाण सुधारण्यासाठी राज्यामध्ये येत्या काही काळात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असल्याची बातमी दैनिक पुढारी या वृत्तपत्राद्वारे देण्यात आलेली आहे. ( Maharashtra Police Recruitment 2023 ) राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे १३६.४५ इतके पोलीस कर्मचारी असून पोलिसांची हीच संख्या २२५ इतकी करण्यात येणार आहे. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या २.४५ लाख इतकी आहे. सदर भरती संदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच घेण्यात येणार आहे.

Maharashtra Police Recruitment 2023 - 2

अर्थ विभागाची उपसमिती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती यांनी घेतलेल्या खातेनिहाय आढाव्यानुसार (Maharashtra Police Recruitment 2023) राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या कायम ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु प्रत्येक पोलीस ठाण्यातील तसेच संबंधित युनिटमधील कर्मचाऱ्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, असे आम्ही सांगितले. हे काम झाल्यानंतर आता आम्ही अतिरिक्त ९८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी किमान ५० टक्के पदांना तरी मंजुरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, असे गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra Police Recruitment 2023

केंद्र सरकारने मार्चमध्ये संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात देशाचे सध्याचे लोकसंख्या पोलीस यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १५२.८० इतके आहे. नागालँडमध्ये हेच प्रमाण सर्वाधिक ११८९. ३३ कर्मचारी तर बिहारमध्ये सर्वात कमी ७५. १६ कर्मचारी इतके आहे.

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

2) Bank Bharti 2023 – जी. पी. पारसिक बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

3) IDBI Recruitment 2023 – आय. डी. बी. आय. बँकेत नोकर भरती ! पदवीधरांना सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

4) Krushi Sevak Bharti in Kolhapur 2023 – कृषी विभागांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी २५० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

5) Krushi Sevak Bharti in Pune 2023 – कृषी विभागांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १८२ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

Leave a Comment