Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

मुंबई – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी Lek Ladki Yojana 2023 अंतर्गत लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय दिनांक १० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Table of Contents

Lek Ladki Yojana 2023

Lek Ladki Yojana 2023 – लेक लाडकी योजनेची कार्यपद्धती खालीलप्रमाणे :

१) पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये,
२) इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये,
३) सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये,
४) ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये,
५) १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

Lek Ladki Yojana 2023 योजनेसंदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी Lek Ladki Yojana 2023 ही योजना राबविण्यात येईल.

१ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या Lek Ladki Yojana 2023 योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.

१ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या Lek Ladki Yojana 2023 योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Lek Ladki Yojana 2023

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सोबत हेही वाचा

  1. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  2. Bombay High Court Bharti 2023 – मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी भरती ! न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांनी लगेच करा अर्ज !!

  3. Government Ayurvedic College Recruitment – शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. MPSC Bharti – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध २५७ पदांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  5. Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

 

Leave a Comment