MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Group C Recruitment 2023 अंतर्गत गट – क संवर्गासाठी ७५१० रिक्त असलेल्या पदांच्या ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. १) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादनशुल्क २) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय, ३) कर सहायक, आणि ४) लिपिक टंकलेखक या पदांच्या ७५१० रिक्त जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १७/१०/२०२३ पासून ते दिनांक ३१/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://mpsconline.gov.in/candidate पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

MPSC Group C Recruitment 2023

जाहिरात क्रमांक ००१/२०२३ दिनांक २० जानेवारी २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ व १२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

यासाठी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ३१ ऑक्टोबर च्या आत अर्ज सादर करावेत. हि भरती प्रक्रिया विविध ७५१० पदांसाठी होत आहे.

MPSC Group C Recruitment 2023

MPSC Group C Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता –

१) जाहिरातीमधील सर्व संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

२) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

३) पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

४) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

५) लिपिक-टंकलेखक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

६) इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 

हे सुद्धा वाचा

  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

 

Leave a Comment