Talathi Recruitment in Maharashtra – तलाठी भरती परीक्षेतून महाराष्ट्र राज्य सरकारला मिळाला १२७ कोटींचा महसूल !!

मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरु झालेली असून, तलाठी पदासाठी ४६४४ जागांसाठी राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या रिक्त जागांसाठी राज्यभरातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या परीक्षा शुल्कासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल १२७ कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. विशेष म्हणजे, पी. एच. डी., इंजिनिअर, एम. बी. ए., झालेल्या हजारो उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनीही या तलाठी Talathi Recruitment in Maharashtra भरती साठी अर्ज केलेले आहेत.

Table of Contents

Talathi Recruitment in Maharashtra

महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल ४ वर्षांनंतर Talathi Recruitment in Maharashtra तलाठी गट (क) भरतीला मुहूर्त मिळाला आहे.

राज्य सरकारने ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून २६ जुन, २०२३ पासून Talathi Recruitment in Maharashtra अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या प्रक्रियेत २३ जुलै पर्यंत सुमारे १३ लाखांच्या जवळ इच्छूक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज भरण्यासाठी सरकारने मुदतवाढ देण्यात दिलेली आहे. यामुळे हा इच्छूक उमेदवारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Talathi Recruitment in Maharashtra

Talathi Recruitment in Maharashtra अंतर्गत एकूण जागांच्या तुलनेमध्ये आलेल्या अर्जाचा विचार केल्यास एका जागेसाठी सुमारे २७५ इच्छूक उमेदवार आहेत.

त्यामुळे तलाठी भरती २०२३ साठी प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झालेली आहे. याचे कारण म्हणजे, मागील कित्येक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच राज्य सरकारला हि परीक्षा २० पेक्षा जास्त दिवस घ्यावी लागणार आहे. तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये , तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे. २३ जुलै पर्यंत महाराष्ट्र शासनाकडे (Talathi Recruitment in Maharashtra) १२ लाख ७७ हजार १०० अर्ज जमा झालेले आहेत. ज्यांची एकूण शुल्क रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेले आहेत. एवढंच नाही तर, हा आकडा येत्या दोन दिवसांत अजून वाढणार आहे.

हेही वाचा – Talathi Recruitment in Maharashtra

१) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

२) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

३) सीमा सुरक्षा दलामध्ये भरती सुरू, ६९ हजार पगार , दहावी पास लगेच अर्ज करा..!

४) राष्ट्रीय तपास संस्था NIA अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती, पगार ९३ हजार, लगेच अर्ज करा..!

५) सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत १००० जागांची मेगा भरती ..!

Leave a Comment