Thane Mahanagar Palika 2023 – ठाणे महानगर पालिकेमध्ये 100 जागांसाठी या पदावर नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा !!

मुंबई – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील Thane Mahanagar Palika 2023 अंतर्गत “परिचारिका”  या पदांच्या एकूण 100 जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परिचारिका पदांच्या 100 रिक्त जागा ठाणे महानगरपालिकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी “के अरविंद कृष्णाThane Mahanagar Palika 2023जी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे” येथे दि. २२/११/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “ठाणे महानगर पालिकेच्या” https://thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Thane Mahanagar Palika 2023

Thane Mahanagar Palika 2023 – रिक्त जागा 

परिचारिका – 100 जागा

Thane Mahanagar Palika 2023 – मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ

पात्र व इच्छुक उमेदवारांनी के अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. २२/११/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.

Thane Mahanagar Palika 2023शैक्षणिक अर्हता व अनुभव

१. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C)

२. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम.) ३.बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य.

४. महाराष्ट्र आवश्यक. नर्सिंग कौन्सिलची नोंदणी

५. शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ/ परिचारिका/ स्टाफ नर्स या कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

६.ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य.

७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

Thane Mahanagar Palika 2023 – दरमहा वेतनश्रेणी

दरमहा 30,000/- रुपये.

वय :- शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या १२ दि. ०३ मार्च २०२३ अन्वये कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे.

Thane Mahanagar Palika 2023 – महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 हे सुद्धा पहा

PCMC Recruitment 2023 – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !

 

Leave a Comment