मुंबई – महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये “क ” प्रवर्गातील जवळ जवळ १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी ZP Bharti 2023 अंतर्गत ०५ ऑगस्ट २०२३ ला जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांनी दिलेली आहे
मार्च २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांमधील गट – क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. परंतु त्यावेळेस राज्यात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता, ZP Bharti 2023 संपूर्ण जगातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पाश्र्वभूमी व इतर विविध कारणांमुळे त्या त्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत.
ZP Bharti 2023 – महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या भरतीसाठी अर्ज कोठे करायचा ?
जिल्हा परिषद भरतीसाठी ०५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपले अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. अर्ज भरवायच्या पदांचा तपशील, ZP Bharti 2023 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता / पात्रता , संबंधित पदांनुसार वेतनश्रेणी, संबंधित पदांनुसार विहित वयोमर्यादा, संबंधित पदांनुसार परीक्षा शुल्क, संबंधित पदांनुसार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पद्धत, संबंधित पदांनुसार अर्ज करण्याची मुदत आणि इतर आवश्यक अटी व शर्ती संबंधित जिल्हा परिषदांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील .
ZP Bharti 2023 – सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळाची यादी पुढे देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदचे नाव |
अधिकृत संकेतस्थळ |
१) भंडारा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२) अमरावती जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
३) बुलढाणा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
४) सोलापूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
५) अहमदनगर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
६) चंद्रपूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
७) नाशिक जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
येथे क्लिक करा |
८) धाराशिव जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
९) बीड जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१०) यवतमाळ जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
११) जालना जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१२) नांदेड जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१३) लातूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१४) नंदुरबार जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१५) गडचिरोली जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१६) जळगाव जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१७) गोंदिया जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१८) हिंगोली जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
१९) वर्धा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२०) सांगली जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२१) रत्नागिरी जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२२) अकोला जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२३) नागपूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२४) परभणी जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२५) ठाणे जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२६) वाशीम जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२७) सातारा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२८) सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
२९) धुळे जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
३०) छ. संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्हापरिषद अ. संकेतस्थळ |
|
३१) पालघर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
३२) पुणे जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
३३) रायगड जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
३४) कोल्हापूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ |
|
ZP Bharti 2023– सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या भरतीसाठी अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी?
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदांनुसार संगणकीय परीक्षा घेण्यात येणार आहे, त्यामुळे इच्छूक व पात्र उमेदवारांनी शक्यतो एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्याने तुमचे अर्ज भरण्यासाठी अर्ज शुल्कापोटी प्रत्येक उमेदवारांचे अनावश्यक पैसे खर्च होऊ शकतात.
- इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार त्या उमेदवारांना एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी संबंधित उमेदवारांना परीक्षा देता न आल्यास त्यासाठी जिल्हा परिषद जबाबदार असणार नाही. असे ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित जिल्हा परिषद भरती परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया हि आयबीपीएस या कंपनीकडून राबविली जाणार आहे.
हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!