मुंबई – मुंबई पोलीस दलामध्ये Mumbai Police Bharti 2023 अंतर्गत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे हेच कंत्राटी होण्याचे बाकी होते काय? मुंबई पोलीस देखील आता कंत्राटी ? अशाप्रकारचे प्रश्न जनतेमध्ये विचारले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी हि भरती करण्यात येणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे.
मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य सरकारच्या गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. (Mumbai Police Bharti 2023) महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून मोठा वाद झाला असतानाच, आता पोलीस दलातही अश्याच प्रकारे कंत्राटी भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची सुमारे ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. Mumbai Police Bharti 2023 – अंतर्गत राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज पडत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा अनेक सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासत असते. त्यामुळे मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Mumbai Police Bharti 2023 अंतर्गत मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरतीची गरज का ?
१) महाराष्ट्र राज्य सरकारने २१ जानेवारी, २०२१ रोजी ७०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
२) ही सदरची भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.
३) जोपर्यंत सदरची भरतीप्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत ११ महिन्यांसाठी मुंबई पोलीस दलामध्ये कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे.
हेही वाचा – Mumai Police Bharti 2023
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!
- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!
- सीमा सुरक्षा दलामध्ये भरती सुरू, ६९ हजार पगार , दहावी पास लगेच अर्ज करा..!
- राष्ट्रीय तपास संस्था NIA अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती, पगार ९३ हजार, लगेच अर्ज करा..!
- सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत १००० जागांची मेगा भरती ..!