Government Hospital Recruitment – सरकारी रुग्णालयात नोकरीची सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात होणार १४ हजार पदांची मेगाभरती ..!

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, सरकारी दंत महाविद्यालयांमध्ये एकूण  १३ हजार, ३९१ रिक्त आहेत. तसेच सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये ८७६ पदे रिक्त आहेत. यासर्वांमधील गट ‘अ’  व गट ‘ब ‘ मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु असून येणाऱ्या काळामध्ये ( Government Hospital Recruitment ) वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिलेले आहे.

Table of Contents

Government Hospital Recruitment

 

महाराष्ट्र राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये (Government Hospital Recruitment ) रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ  यांनी उत्तर दिलेले आहे.

सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गामधील ९१, सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ रिक्त पदे भरण्यात आलेली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आलेली आहेत. तर उर्वरित रिक्त पदे लवकरच भरण्यात येत आहेत.

गट ‘क’ संवर्गांमधील ५१८० पदे भरण्याकरिता टी.सी.एस.आय.ओ.एन. (T.C.S.I.O.N.) कंपनीकडून स्पर्धा घेण्यात आलेली आहे. (Government Hospital Recruitment) गट ‘ड ‘ संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ  यांनी सांगितले.

सरकारी रुग्णालयातील रिक्त पदे (Government Hospital Recruitment) एमपीएसीमार्फत भरण्यात येणार !

  1. महाराष्ट्र राज्य सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आलेले आहेत.
  2. सदर भरतीविषयाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आलेले आहेत. हि रिक्त पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.

Government Hospital Recruitment

महाराष्ट्र सरकारी दंत महाविद्यालयांमधील (Government Hospital Recruitment ) रिक्त पदे

पदाचे नाव (Name of Posts )

रिक्त पदांची संख्या (Number of Vacant Posts )

१) अधिष्ठाता

२) प्राध्यापक

२४५

३) सहयोगी प्राध्यापक

४००

४) सहायक प्राध्यापक

१००८

५) संवर्ग गट ‘क’ मधील पदे

७७५६

६) संवर्ग गट ‘ड’ मधील पदे

३९७४

एकूण रिक्त पदे

१३३९१

 

महाराष्ट्र सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील (Government Hospital Recruitment ) रिक्त पदे 

पदाचे नाव (Name of Posts )

रिक्त पदांची संख्या (Number of Vacant Posts )

१) अधिष्ठाता

२) प्राध्यापक

२६

३) सहयोगी प्राध्यापक

४४

४) सहायक प्राध्यापक

८६

५) संवर्ग गट ‘क’ मधील पदे

५१०

६) संवर्ग गट ‘ड’ मधील पदे

२१०

एकूण रिक्त पदे

८७६

 

Government Hospital Recruitment सोबत हेही वाचा – 

१) Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..!

२) Rayat Shikshan Sanstha Recruitment – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांची थेट भरती ! लगेच अर्ज करा !!

३) Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय !

४) Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

५) Maharashtra Govt Recruitment – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

 

Leave a Comment