Maratha Reservation News – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ! अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार ! नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन !!

मुंबई, दि. ६ : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. Maratha Reservation News : सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

Table of Contents

Maratha Reservation News

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. Maratha Reservation News : जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Maratha Reservation News – समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे : 

समितीची पहिली बैठक

1) छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे.

2) त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

3) दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे.

4) त्यानंतर हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे,

5) नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे.

6) दि.२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता,

7) धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर

8) बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Maratha Reservation News

Maratha Reservation News

००००

सोबत हेही वाचा

  1. Bank Bharti 2023 – जी. पी. पारसिक बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  2. Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

  3. Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकर भरती ! ५६० जागांची भरती ! ५० हजारपेक्षा जास्त पगार ! लगेच करा अर्ज !

  4. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. Bombay High Court Bharti 2023 – मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी भरती ! न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांनी लगेच करा अर्ज !!

Leave a Comment