मुंबई – महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये आज काही तांत्रिक कारणामुळे गडबड – गोंधळ निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. Talathi Bharti Exam – आज दिनांक २१ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेमध्ये होऊ घातलेला तलाठी भरती परीक्षा पेपर टी. सी. एस. कंपनीच्या डेटा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे सकाळी होणारा नियोजित पेपर उशिरा म्हणजे तब्बल दोन तास उशिरा म्हणजे ११.०० वाजता चालू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सगळेच्या सगळे म्हणजे सर्व ११५ परीक्षा केंद्रांवर हा तांत्रिक घोटाळा निर्माण झाल्यामुळे आज होऊ घातलेला नियोजित पेपर दोन तास उशिरा सुरु झाल्याने, आज होत असलेल्या सर्व तिन्ही सत्रांतील परीक्षा प्रत्येकी दोन दोन तास उशिरा सुरु करण्यात येणार आहेत. सदर तलाठी भरती परीक्षेसाठी बदलेल्या वेळापत्रकाची संबंधित उमेदवारांनी योग्य ती नोंद घेण्याची विनंती सूचना पुढील जाहीर निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
Talathi Bharti Exam – तलाठी भरती परीक्षेसाठी बदलेल्या वेळापत्रकासाठी जाहीर निवेदन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सोबत हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!